पुणे : पदवी, पदव्युत्तर स्तरावर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम राबवा : विद्यापीठ अनुदान आयोग

पुणे : पदवी, पदव्युत्तर स्तरावर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम राबवा : विद्यापीठ अनुदान आयोग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्या शाखांमध्ये सायबर सुरक्षा अभ्यासक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. जागरूक, जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आल्याचेही 'यूजीसी'ने स्पष्ट केले.
'यूजीसी'ने सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासंबंधीचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सायबर जागरूकता दिवसाच्या औचित्याने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सादर करण्यात आला आहे. उच्च शिक्षण संस्थांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, सायबर कायदा, समाजमाध्यमे आणि सुरक्षितता, ई-कॉमर्स अ‍ॅण्ड डिजिटल पेमेंट्स, डिजिटल साधनांची सुरक्षितता, सायबर सुरक्षेची साधने आणि तंत्रज्ञान या घटकांचा पदवी स्तराच्या अभ्यासक्रमात समावेश आहे, तर सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, सायबर कायदा, डाटा सुरक्षा आणि खासगी डाटा, सायबर सुरक्षा व्यवस्थापन, पूर्तता आणि प्रशासन आदी घटक पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news