UGC Online Degree: राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

प्रवेशाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर : यूजीसीकडून पात्र विद्यापीठांची यादी जाहीर
UGC Online Degree:
UGC Online Degree: राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रमPudhari News Network
Published on
Updated on

पुणे : शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै-ऑगस्टच्या सत्रात ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या देशातील 126 विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. (Latest Pune update)

यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाच, मुंबई विद्यापीठाला एक, शिवाजी विद्यापीठाला तीन अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविता येणार आहेत. सर्वाधिक दहा अभ्यासक्रम सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे आहेत. त्याशिवाय भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाला चार, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला पाच, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला चार, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला चार, पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला तीन अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळाली आहे.

UGC Online Degree:
Pulse Polio Drive Pune: रविवारी ‌‘दो बूंद जिंदगी के'; तीन लाख बालकांना मिळणार पोलिस डोस

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पारंपरिक आणि दूरस्थ पदवी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह ऑनलाइन अभ्यासक्रमांनाही समकक्षता देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासाठी विद्यापीठांना यूजीसीकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासाठी पात्र ठरलेल्या केंद्रीय, खासगी, अभिमत, राज्य विद्यापीठांची यादी तसेच अभ्यासक्रम राबविण्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे.

UGC Online Degree:
MPSC vacancies: एमपीएससी गट ‌‘क‌’च्या 938 जागा भरणार; या तारखेपर्यंत आहे अर्ज भरण्याची संधी

नियमावलीनुसार, संबंधित संस्थांना फँचायझी किंवा भागीदारी पद्धतीने कोणतेही ऑनलाइन अभ्यासक्रम राबविता येणार नाहीत. अभिमत विद्यापीठे वगळता केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांना व्यवस्थापन, संगणक उपयोजन, ट्रॅव्हल आणि टुरिझम या शाखांतील अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. संबंधित अभ्यासक्रम विशिष्ट नियामक संस्थांच्या अखत्यारीतील असल्यास त्यांच्या मान्यतांच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष, मंजूर विद्यार्थिसंख्या आणि संबंधित अटींचे पालन करणे आवश्यक आहे. यूजीसीच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रम नियमावली 2020 चे पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांची जबाबदारी विद्यापीठाचीच असेल, असे नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news