पुणे : उद्धव ठाकरेंची गाडी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत आहे : पालकमंत्री पाटील

पुणे : उद्धव ठाकरेंची गाडी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत आहे : पालकमंत्री पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. त्यांच्या मुद्द्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असहमती दर्शवली आहे. यावरून ठाकरे यांची अजानच्या दिशेने चालणारी गाडी रुळावर येऊन पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत आहे. त्यांचे स्वागत आहे,' अशी खोचक प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

पुण्यात विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री पाटील माध्यमांशी बोलत होते. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयांवरून ठाकरेंच्या मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. एकंदरीत काँग्रेसचा व्होट बँकेसाठीचा दुटप्पीपणा ठाकरे यांना उशिरा का असेना लक्षात आला आहे. सरकार आणि व्होट बँकेपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले होते.

सावरकरांच्या निमित्ताने ही चूक झाली हे लक्षात आले असेल, तर ती चूक सुधारणे सर्वसामान्यांना आवडेल, असेही पाटील म्हणाले. पाटील म्हणाले, याचा अर्थ त्यांनी भाजपशी जुळवून पुढे सरकार स्थापन केले पाहिजे, असे होणार नाही. कारण आम्ही खूप पुढे गेलो आहोत. आता आम्ही पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सहज सरकार आणू, त्या निवडणुकांमध्ये आम्ही मजबूत असणार आहोत. त्यामुळे आम्हाला शिंदे यांची शिवसेना पुरेशी आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news