Workers Death: इमारतीवरून पडून दोन कामगारांचा मृत्यू; विठ्ठलवाडी, पर्वती दर्शन परिसरातील घटना

दोन ठेकेदारांवर सिंहगड रोड, पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
Abandoned Dead Body Case
इमारतीवरून पडून दोन कामगारांचा मृत्यू; विठ्ठलवाडी, पर्वती दर्शन परिसरातील घटनाFile Photo
Published on
Updated on

पुणे: रंगकाम करताना इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून तोल जावून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. मोबुद मारुफ हसन (वय 34, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. कामगाराला सुरक्षाविषयक साधने न पुरवून दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी रंगकाम ठेकेदारावर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी इसरार करीमुल्ला खान (वय 28, रा. विठ्ठलवाडी लेबर कॅम्प, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतिकुर रहेमान खान (वय 37, रा. नांदेड सिटी मूळ : उत्तरप्रदेश) या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड विठ्ठलवाडी कमानीजवळील स्कायडेल गृहप्रकल्पाच्या डी विंग इमारतीत घडली आहे.  (Latest Pune News)

Abandoned Dead Body Case
CM Ganpati Darshan: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळांचे दर्शन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबुद हसन हा मूळचा उत्तरप्रदेशमधील असून, तो रंगकाम ठेकेदार खान याच्याकडे इमारतीला रंग देण्याचे काम करत होता. रविवारी सकाळी तो इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर रंगकाम करत होता. त्या वेळी तोल जाऊन मोबुद खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या मोबुदला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र, त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी ठेकेदार खान याने कामगार मोबुद याच्याकडून काम करून घेत असताना, त्याच्या जीविताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, वायर रोप इत्यादी आवश्यक सुरक्षा साधने पुरविणे आवश्यक असताना ती पुरविली नाहीत. त्यामुळे मोबुद याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून ठेकेदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. अडागळे करीत आहेत.

Abandoned Dead Body Case
Rainfall Effect: शहराचे हरित छत्र 25 ते 30 टक्क्यांनी वाढले; मे ते ऑगस्ट सतत चार महिने संततधारेचा परिणाम

तसेच, नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारतीत काम करताना तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.30) सायंकाळी पर्वती दर्शन परिसरात घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरवून दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदारासह दोघांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गेंदमाई रघुराई साकेत (वय 29, मूळ रा. कुचवाही, जि. सिधी, मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साकेत याच्या भावाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदारासह सुरक्षाविषयक पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन भागातील एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. साकेत शनिवारी (दि.30 ऑगस्ट) सायंकाळी इमारतीत तिसर्‍या मजल्यावर काम करत होता.

त्या वेळी तोल जाऊन पडल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. साकेत याला सुरक्षाविषयक साधने न पुरविणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news