

खुटबाव: दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे सोमवारी (दि. १८) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडली असून. यातील एका घरातील पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पती-पत्नीच्या डोक्यात हातावर धारदार शस्त्राने तसेच राॅडने मारहाण केली आहे. जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Pune News)
मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या तीन चोरांनी दीड ते दोन लाख रुपये रोख व पाच तोळे सोने चोरी करून धमकी देऊन पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून या चोरीच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.