Pune News : धुरांचा लोट, आग आणि एकच पळापळ... आपत्कालीन यंत्रणा सरसावली, नेमकं घडलं काय?

Pune mock drill: पुण्यातील विधान भवनात मॉक ड्रिल
Pune mock drill
पुण्यातील विधान भवनात मॉक ड्रिल करण्यात आले.pudhari photo
Published on
Updated on

Pune mock drill

पुणे : धोक्याची सूचना देण्यासाठी असलेला भोंगा वाजतो ना वाजतोच तोच विधान भवनच्या दुस-या मजल्यावर एक बॉम्बस्फोट झाला. धुरांचे लोट उठले तर एका ठिकाणी आगही लागली. अचानक आलेल्या या संकटाने सर्वच जण भांबावून गेले व सर्वत्र पळापळ सुरू झाली. पण तात्काळ आलेल्या आपत्कालीन यंत्रणेने अवघ्या 23 मिनिटांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणली. विधान भवन येथील बॉम्बस्फोट झालेल्या इमारतीचा ताबा घेतला आणि जखमींना लागलीच रूग्णालयात हलविले.

हे सर्व घडले हे खरे असले तरी ते पुर्वनियोजित होते. हो...! हे एक मॉकड्रिल होते... संरक्षण सराव. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने, बुधवारी (दि.7) शहरी भागातील विधान भवन, औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच ग्रामीण भागात मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद येथे दुपारी चार वाजता एकाचवेळी ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले.

Pune mock drill
Operation Sindoor: जिन मोहि मारा, तिन मोहि मारे.... संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आठवले प्रभू हनुमानाचे शब्द

विधान भवन येथे झालेल्या मॉकड्रिलच्यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी अधिकारी उपस्थित होते. नागरी संरक्षण दलाचे कर्नल प्रशांत चतुर यांच्या नेतृत्वाखाली हे मॉकड्रिल घेण्यात आले. या मॉकड्रिल मध्ये केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी असे सुमारे अडीचशे जण सहभागी झाले होते.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही शहरांवर बॉम्ब हल्ला झाल्यास काय करावे, अशा आपत्तीच्या वेळी संरक्षणात्मक उपायोजना तात्काळ कशा राबवाव्यात. यासाठी हे मॉकड्रिल’ किंबहुना संरक्षण सराव घेण्यात आला.

असे झाले मॉकड्रिल

बुधवारी विधान भवन येथे पार पडलेल्या या मॉकड्रिल’ मध्ये प्रारंभी चार वाजता भोंगावा वाजला, ही धोक्याची सूचना येताच विधान भवनाच्या एका इमारतीमध्ये दुसर्‍या मजल्यावर बॉम्बस्फोटाचा आवाज झाला व धुराचे लोट उठले तसेच एका कोपर्‍यात आगही लागली. ही घटना घडतात एकच धावपळ उडाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्याचवेळी सर्व सुरक्षा यंत्रणा, अग्निशामक दल, एन डी आर एफ, पोलीस यांना पाचरण करण्यात आले. आरोग्य सेवा तात्काळ मिळावी म्हणून 108 नंबर या अ‍ॅम्बुलन्स सेवेलाही कुठली पूर्वकल्पना न देता तेथूनच फोन करण्यात आला. विशेष म्हणजे अवघ्यात दोन-तीन मिनिटात आरोग्यसेवेच्या अ‍ॅम्बुलन्स येथे पोहोचल्या.

दरम्यान डॉगस्कॉड, बॉम्ब स्कॉडही तिथे आले. अग्निशामक दलाच्या बंबांनी आग विझवली. लष्करी जवानांनी इमारतीत प्रवेश करून सर्व भागाची झाडाझडती घेतली. त्याचवेळी एन डी आर एफ जवानांनी इमारतीत अडकलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना व्हीलचेअर, स्ट्रेचरवर उचलून इमारती बाहेर काढून संरक्षक ठिकाणी नेले. तर काहींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

अ‍ॅम्बुलन्स, पोलीस गाड्यांचे सायरन, अग्निशामक दलाच्या गाड्यांचा आवाज, खबरदारीचे उपाय घेण्यासाठी देण्यात येणार्‍या सूचना, पोलिसांनी रस्सी लावून बंद केलेला भाग व सर्व यंत्रणा मधील समन्वय याचे दर्शन बुधवारी येथे घडले. समन्वयातून आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे मदत कार्य पोहोचू शकते, याचा हा सराव अवघ्या 23 मिनिटात पार पडला.

आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांनी कशी जबाबदारी घ्यावी. तसेच अशा परिस्थितीमध्ये पोलिस, स्थानिक यंत्रणा, लष्कर, याबरोबरच इतर सेवांच्या सहाय्याने नागरिकांचे प्राण कसे वाचविले जावेत. जखमींना कसे रूग्णालयापर्यत पोहचवावे यासाथी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news