पुणे : पीएम किसान योजनेच्या लाभातून बारा हजार लाभार्थी वगळले

पुणे : पीएम किसान योजनेच्या लाभातून बारा हजार लाभार्थी वगळले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बारावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महसूल विभागाचा भर आता जमीन नोंदी अद्ययावत करण्यावर असून, त्यातून सुमारे 12 हजार दुबार, मृत, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. त्याचा फायदा अन्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. पंतप्रधान सन्मान योजनेचे काम कृषी व महसूल विभागाला देण्यात आले होते, परंतु आधार जोडणीचे काम कुणी करावे, त्यानंतर या याद्या अद्ययावत कुणी कराव्यात, यावरून महसूल व कृषी विभागात मतभेद निर्माण झाले होते. या कामावर तलाठ्यांनी असहकार आंदोलनही केले.

तसेच कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनीही महसूल विभागाचे काम करणार नाही, असा पवित्रा घेतला घेता होता. त्यामुळे आधार जोडणीच्या व याद्या अद्ययावत करण्याचे काम रखडले होते, परंतु आता वाद मिटला असून, महिनाभरात हे काम पूर्णवेळ कृषी विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विशेष लक्ष घालून जिल्ह्यात दुबार, मृत, अपात्र लाभार्थी शोधले आहेत. आता महसूल विभाग पीएम किसान पोर्टलवर जमीन नोंदीची माहिती अद्ययावत करत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार पैकी तब्बल 4 लाख 45 हजार लाभार्थ्यांचे जमीन रेकॉर्ड विक्रमी वेळेत पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.

त्यात सुमारे 7 हजार लाभार्थी मृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या लाभार्थ्यांची नावे पोर्टलवरून वगळण्यात आली आहेत. तसेच अन्य अपात्र लाभार्थी जसे प्राप्तिकर भरणारे, दुबार नावे असलेले, एकाच कुटुंबातील अन्य शेतकरी असे सुमारे 5 हजार लाभार्थीही कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुमारे 45 हजार लाभार्थ्यांची जमीन नोंद अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, यातील अनेक लाभार्थी रोजगारानिमित्त अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. अशा लाभार्थी शोधण्यासाठी आंतरजिल्हा लाभार्थ्यांची नावे राज्यभर दिल्यास त्यातून दुबार, मृत किंवा अपात्र लाभार्थी शोधण्यास आणखी मदत होणार आहे, अशी माहिती
सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news