

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ शुक्रवारी (दि. 28 पहाटे अडीचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे एक ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने या ट्रकचा चालक आणि त्याचा सहकारी या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर क्रमांक 41 वर पुण्याच्या दिशेने जाणार्या ट्रक क्रमांक (आर. जे. 27 जी.डी. 4866) ला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. त्यानंतर ट्रॅकच्या केबिनेने पेट घेतला.
या घटनेची माहती मिळताच आय.आर.बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपली नगरपालिकेची फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळविले. वाहतूक पोलिस बोरघाट, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. परंतु, तोपर्यंत एक्सप्रेस-वेवर अर्धातास वाहतूककोंडी झाली होती.