मंचर : रास्त भावाने बाळ हिरडा खरेदी करू; आदिवासी विकासमंत्र्यांचे किसान सभेला आश्वासन

मंचर : रास्त भावाने बाळ हिरडा खरेदी करू; आदिवासी विकासमंत्र्यांचे किसान सभेला आश्वासन

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बाळ हिरड्यास रास्त भाव मिळावा यासाठी सरकार आदिवासी विकास महामंडळ प्रभावी हस्तक्षेप करेल. लिलावात शेतकर्‍यांना अपेक्षित भाव न मिळाल्यास किमान आधार भावाने सरकार प्रसंगी हिरडा खरेदी करेल. यासाठी दरवर्षी इतर पिकांप्रमाणे हिरडा पिकाचेही किमान हमीभाव जाहीर केले जातील, असे ठोस आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमामंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बाळ हिरड्यास रास्त भाव मिळावा यासाठी सरकार आदिवासी विकास महामंडळ प्रभावी हस्तक्षेप करेल.र गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत किसान सभेला देण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे सन 2020 मध्ये हिरड्याचे मोठे नुकसान झाले होते. मदत व पुनर्वसन विभागाने या वादळात झालेल्या इतर पिकांची नुकसानभरपाई दिली; मात्र हिरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई अद्यापही देण्यात आली नव्हती. अकोले, लोणी पायी मोर्चादरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हिरडा पिकाच्या नुकसानीची ही भरपाई संबंधित शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग, शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाशी समन्वय करेल व ही रक्कम शेतकर्‍यांना मिळवून देईल, असे डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोड, आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. किसानसभेच्या शिष्टमंडळात डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारे, राजाराम गंभीरे, अ‍ॅड. नाथा शिंगाडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, गणपत घोडे, रामदास लोहकरे, जितेंद्र चोपडे, श्याम शिंदे यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news