जिल्हाधिकार्‍यांची बदली करा: कट्यारेंचे निवडणूक आयोगाला पत्र

जिल्हाधिकार्‍यांची बदली करा: कट्यारेंचे निवडणूक आयोगाला पत्र

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदाराच्या प्रभावाखाली काम करीत आहेत. त्यांची लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी बदली करावी, अशी मागणी खेडचे प्रांताधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महसूल विभागाचे अपर सचिव यांना लिहिलेल्या पत्रात कट्यारे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर विविध आरोप केले आहेत. आमदार मोहिते आणि जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर कट्यारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबातचे पत्र त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे. त्यात आमदार मोहिते आणि जिल्हाधिकारी दिवसे माझ्या कामात हस्तक्षेप करून त्रास देत आहेत. वारंवार चौकशी आणि दबाव आणला जात आहे, असे म्हटले आहे.

जोगेंद्र कट्यारे भ्रष्ट, मानसिक रुग्ण

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे हा अधिकारी भ्रष्ट आहे. मानसिक रुग्ण आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी ते काम करीत होते, तेथेही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्या वेळी त्याने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. भ्रष्टाचार करून तो उघड होऊ लागल्यावर असे पांघरुण घालायचा त्यांचा प्रयत्न असतो. खेड तालुक्यातील रिंगरोड प्रकल्पात शेतकर्‍यांना पैसे वाटप करताना त्यांनी मोठा घोळ केला. तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले.

आमदार म्हणून माझा हा अधिकार आहे. साडेचार कोटी रुपये देऊन खेडची जागा मिळवली आहे, असे ते म्हणाले. शासकीय अधिकार्‍याने बदलीसाठी कोट्यवधींची माया कुणाला व का दिली? याचीही चौकशी होण्याची गरज आहे, असे आमदार मोहिते म्हणाले. याबाबत विधानसभेत आवाज उठविणार आहे. विधानभवनासमोर उपोषण करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्यावर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात आरोप झाले. अशातच शासकीय अधिकार्‍यांच्या आरोपामुळे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील टार्गेट झाले आहेत. अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात एकापाठोपाठ एक घडत असलेल्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news