Lok Adalat Traffic Fine: लोकअदालतीत वाहनधारकांना मिळणार दंडात सवलत

10 ते 13 सप्टेंबरदरम्यान येरवडा वाहतूक विभागात रक्कम भरता येणार
Lok Adalat Traffic Fine
लोकअदालतीत वाहनधारकांना मिळणार दंडात सवलतFile Photo
Published on
Updated on

traffic fine discount in Lok Adalat

पुणे: वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे. 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. (Latest Pune News)

Lok Adalat Traffic Fine
Fake Admission Scam: विद्यार्थी, पालकांनो सावधान! प्रवेशाच्या नावाखाली फसवणारी टोळी सक्रिय

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे.

यामध्ये मिळणार सवलत

विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, विनापरवाना तसेच विना पीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे आदीमध्ये वाहनधारकांना सवलत मिळणार आहे.

Lok Adalat Traffic Fine
Air Quality Pune: हवेच्या गुणवत्तेत पुणे देशात 10 व्या क्रमांकावर; 23 व्या क्रमांकावरून थेट पहिल्या दहात उडी

लोकअदालतीत दंडाच्या शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी वाहनचालकांची होती. यंदाच्या लोकअदालतीत त्यांना ती संधी मिळणार आहे. त्यामुळे, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील.

- ॲड. नीलेश वाघमोडे, जिल्हा व सत्र न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news