Fake Admission Scam: विद्यार्थी, पालकांनो सावधान! प्रवेशाच्या नावाखाली फसवणारी टोळी सक्रिय

विद्यार्थी, पालकांनी प्रवेशाच्या वेळी सावध राहण्याची आवश्यकता
Fake Admission Scam
विद्यार्थी, पालकांनो सावधान! प्रवेशाच्या नावाखाली फसवणारी टोळी सक्रियPudhari
Published on
Updated on

पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देत असल्याचे सांगून विद्यार्थी व पालकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.

या टोळीचा म्होरक्या महागड्या रेंज रोव्हर गाडीमध्ये फिरून मोबाईलमध्ये बनावट कागदपत्रांचे दस्तऐवज तयार करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत असून यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील काही व्यक्ती सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Pune News)

Fake Admission Scam
Air Quality Pune: हवेच्या गुणवत्तेत पुणे देशात 10 व्या क्रमांकावर; 23 व्या क्रमांकावरून थेट पहिल्या दहात उडी

पुणे शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश करून देतो, असे सांगून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या दलालांचा आणि त्यांच्या टोळीपासून सावध राहणे आवश्यक आहे. आपल्या पाल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून काही पालक अशा बहुरूपी दलालांच्या बोलण्याला बळी पडतात.

Fake Admission Scam
Flower Prices Pitrupaksha: पितृपंधरवड्यामुळे फुलांचे भाव निम्म्यावर; मागणीत मोठ्या प्रमाणात घट

यामुळे सामान्य कुटुंबातील पालकांची लाखो रुपयांची फसवणूक होते. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा दलालांपासून सावधान राहणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणारी मोठी टोळी पुण्यासह दिल्लीमध्ये सक्रीय असून अनेक बोगस, बनावट बेकायदा प्रवेश करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा दलाल टोळीपासून सावध राहावे, असे आवाहन युवा सेनेने केले आहे.

आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार ‌’गोपी‌’ ‌’राहुल झा‌’ ही व्यक्ती महाविद्यालयात प्राध्यापकाच्या भूमिकेत बहुरूपी म्हणून सर्वत्र फिरत आहे. प्राध्यापक असल्याचे भासवून बहुतांश पालकांना त्याने गंडा घातला आहे. या गंडा घालणाऱ्या टोळीतील काही सदस्याचे फोटो पुरावे आहेत. उच्च शिक्षण विभाग, सीईटी तसेच पोलिसांनी संबंधितांवर वेळीच कारवाई करावी, अन्यथा पुण्याचे शैक्षणिक वातावरण नासवणाऱ्या या समाजकंटकांचा बंदोबस्त युवा सेनेला करावा लागेल.

- कल्पेश यादव, युवासेना सहसचिव, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news