

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिव्हिल कोर्ट ते रामवाडी यादरम्यान पुणे मेट्रो रिच-तीन या मार्गिकेवर एन. एम. चव्हाण चौक ते अॅडलॅब चौक यादरम्यान मेट्रोच्या कल्याणीनगर रेल्वेस्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
एन. एम. चव्हाण चौकाकडून अॅडलॅब चौकाकडे जाणारी वाहतूक तसेच अॅडलॅब चौकाकडून एन. एम. चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिशप स्कूलकडून एन. एम. चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड अॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक तीन येथून एन. एम. चव्हाण चौकाकडे जावे. तर एबीसी चौकाकडून येणार्या वाहनचालकांनी एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक तीन येथून अॅडलॅब चौकाकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.