स्वारगेट भागात दोन दिवस वाहतुकीत बदल

पीएमपी बसमधून मतपेट्या आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे.
Pune News
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतुकीत बदलFile Photo
Published on
Updated on

Pune: स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि.19 नोव्हेंबर) आणि बुधवारी (दि.20 नोव्हेंबर) असा दोन दिवस वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील मतदान केंद्रातून मतपेट्या, तसेच अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पीएमपी बसमधून मतपेट्या आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरू स्टेडियम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी आणि बुधवारी बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

Pune News
सर्वसामान्य घरातल्या अमितला आमदार करा : उद्धव ठाकरे

मंगळवारी (दि.19 नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेटमधील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणार्‍या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणार्‍या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देणात येणार आहे.

बुधवारी (दि.20 नोव्हेंबर) सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेटमधील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

मतदान साहित्य श्री गणेश कला क्रीडा रंगमचमधील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सारसबागेकडे जाणार्‍या वाहनांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news