पुणे : पाणी, कचरा, रस्ते, ड्रेनेज, अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यांसारख्या नागरी प्रश्नांपासून सरत्या वर्षात पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, सर्व समस्या 'जैसे थे'च असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पाडली आहे. तर दुसरीकडे शहराच्या विकासाच्या काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर एचसीएमटीआर-सारखे प्रकल्प कागदावरच आहेत.