Chandra Grahan 2025: रविवारी रात्री दिसणार लालचंद्र; जाणून घ्या पुण्यातील चंद्रग्रहणाचा कालावधी...

रविवारी 7 सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून दिसणार आहे.
Pune News
रविवारी रात्री दिसणार लालचंद्र; जाणून घ्या पुण्यातील चंद्रग्रहणाचा कालावधी...Pudhari
Published on
Updated on

पुणे: रविवारी 7 सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून दिसणार आहे. संपूर्ण चंद्रबिंब लाल रंगात दिसरणा असल्याने या घटनेला खगोल शास्त्रज्ञांनी ब्लड मून असे नाव दिले आहे. शहरातील ज्योर्तिविद्या परिसंस्थेच्या वतीने केसरीवाडा येथील वेधशाळेतून चंद्राच्या विविध छटा बघता येणार आहेत.

पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जाते अन् चंद्रावर सावली पडते. त्यामुळे चंद्राला लालसर रंग देते. यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. हा योग रविवारी 7 सप्टेंबर रोजी येत असून ग्रहणाचा स्पर्श रात्री 9.30 पासून तर मोक्षकाळ उत्तर रात्री 1.30 वाजता होणार आहे. (Latest Pune News)

Pune News
Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळीत 100 टक्के पाणीसाठा; घाटमाथ्यावरील पावसामुळे ‘खडकवासला’च्या विसर्गात वाढ

ज्योर्तिविज्ञान परिषदेच्या वतीने 7 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 पासून मध्यरात्रीपर्यंत केसरीवाडा वेधशाळेत सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चंद्र आणि ग्रहांच्या छटा दुर्बिणीद्वारे पाहता येणार आहे. मात्र ही दृश्यमानता ढगांवर अवलंबून असेल. काही डेमो आणि परदेशातील सदस्यांसह ग्रहणाचे थेट प्रक्षेपण हे मुख्य आकर्षण असेल जिथे आपल्याला जगाच्या विविध भागांमधून ग्रहण पाहण्याची संधी मिळेल.

Pune News
Ganesh festival Pune: टिळक रस्त्यावरून मिरवणूक काढणार्‍या गणेश मंडळांची पालिकेकडून फसवणूक; मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आरोप

पुण्यातील चंद्रग्रहणाचा कालावधी...

ग्रहण स्पर्श - रात्री 8:58

ग्रहण सुरू - रात्री 11

चंद्राचे पूर्ण लाल बिंब - रात्री 11:42

ग्रहणाचा मोक्षकाळ सुरू - रात्री 12:22

ग्रहणाचा पूर्ण मोक्ष - 1:26

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news