इंदापुरात नेत्यांच्या हाती घड्याळ; मात्र जनतेने फुंकली तुतारी

इंदापुरात नेत्यांच्या हाती घड्याळ; मात्र जनतेने फुंकली तुतारी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आल्यानंतर गावगावच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बोलती बंद झाली आहे. गावच्या चौकात उभे राहून घड्याळ निवडून येणार असल्याच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासावर पाणी फिरवत जनतेने मात्र जोरात तुतारी फुंकल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणी महायुतीचा धर्म पाळला तर कोणी महाविकास आघाडीचे काम केले हे या आकडेवारीतून स्पष्ट दिसून आले आहे. गावागावात कुणी लीड घेतले, कोण मायनस गेले यावरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे व भरणेवाडी या गावांमध्ये मात्र माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आघाडी असल्याचे दिसत. यामध्ये अंथुर्णेमध्ये सुनेत्रा पवार यांना 1 हजार 725, तर सुप्रिया सुळे यांना 1 हजार 337 म्हणजे 388 मतांची आघाडी सुनेत्रा पवार यांना मिळाली आहे. भरणेवाडीत सुनेत्रा पवार यांना 1 हजार 663 मते, तर सुप्रिया सुळे यांना 1 हजार 71 मते मिळाली आहेत. 980 मतांची आघाडी सुनेत्रा पवार यांना मिळाली आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात सुनेत्रा पवार यांना 2 हजार 609 मते, तर सुप्रिया सुळे यांना 3 हजार 18 मते मिळाली असून, 409 मतांची आघाडी सुळे यांना मिळाली आहेत. मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या शेळगाव येथे सुनेत्रा पवार यांना 2 हजार 141 मते, तर सुप्रिया सुळे यांना 2 हजार 553 मिळाली असून, 412 मतांची आघाडी सुळे यांना मिळाली आहे.

गावो-गावी सुप्रिया सुळेंनी आघाडी गाठली

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या सराटी गावात सुनेत्रा पवार यांना 607, तर मग सुप्रिया सुळे यांना 680 मते मिळाली असून, 75 त्यांची सुळे यांनी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या रुई गावामध्ये सुनेत्रा पवार यांना 683, तर सुप्रिया सुळे यांना 920 मते मिळाली असून, 237 मतांची आघाडी सुळे यांना मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कळस गावामध्ये सुनेत्रा पवार यांना 1 हजार 561 मते, तर सुप्रिया सुळे यांना 1 हजार 994 मध्ये मिळाले असून, 433 मतांची सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या लाखेवाडी गावामध्ये सुनेत्रा पवार यांना 1 हजार 249 तर सुप्रिया सुळे यांना 1 हजार 311 मते मिळाले असून, 62 मतांची सुळे यांना आघाडी मिळाली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या हिंगणगाव येथे सुनेत्रा पवार यांना 226 मते, तर सुप्रिया सुळे यांना 536 मते मिळाली असून, 310 मतांच्या आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली आहे. निमगाव केतकी गावामध्ये सुनेत्रा पवार यांना 2 हजार 603 व सुप्रिया सुळे यांना 4 हजार 39 मते मिळाली असून, 1 हजार 436 मतांची सुळे यांना आघाडी आहे. इंदापूर शहरात सुनेत्रा पवार यांना 5 हजार 852 मते, तर सुप्रिया सुळे यांना 7 हजार 589 मते मिळाली असून 1 हजार 737 मतांची सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली आहे. लुमेवाडी गावात सुनेत्रा पवार यांना 284 तर सुप्रिया सुळे यांना 1 हजार 399 मते मिळाली असून 1 हजार 110 मतांची सुळे यांना आघाडी मिळाली आहे.

  • 329 बुथपैकी 263 बुथवर सुप्रिया सुळे यांना आघाडी
  • केवळ 66 बुथवर सुनेत्रा पवार यांच्या घड्याळाची टिकटिक
  • बड्या नेत्यांच्या गावातही सुप्रिया सुळेंनाच पसंती

भिगवण आणि बोरी गावांत सुनेत्रा पवारच !

भिगवण येथे सुनेत्रा पवार यांना 2 हजार 521 तर सुप्रिया सुळे यांना 2 हजार 277 मते मिळाली असून, 244 मतांची आघाडी सुनेत्रा पवार यांना मिळाली आहे. बोरी गावामध्ये सुनेत्रा पवार यांना 1 हजार 919 व सुप्रिया सुळे यांना 1 हजार 589 मते मिळाली असून, 330 मतांची आघाडी सुनेत्रा पवार यांना मिळाली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news