टोमॅटो, कांद्याचे भाव घसरले

टोमॅटो, कांद्याचे भाव घसरले
Published on
Updated on

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो व कांद्याची मोठी आवक झाली. आवक वाढल्याने भाव घसरले. पालक व मेथीची आवक घटली, तर शेपूची मोठी आवक झाली. जळगाव भुईमूग शेंगाची आवक सुरू झाली आहे. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी व म्हैस यांच्या संख्येत वाढ झाली, तर बैल व शेळ्या-मेंढ्या यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 3 कोटी, 15 लाख रुपये झाली. कांद्याची एकूण आवक 2,000 क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 900 क्विंटलने वाढ झाल्याने भावात 200 रुपयांची घट झाली. कमाल भाव 2500 रुपयांवरून 2300 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून बटाट्याचा कमाल भाव 2000 रुपयांवर स्थिरावला. टोमॅटोची आवक वाढल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव प्रतिकिलोस 25 ते 35 रुपयांपर्यंत स्थिरावले. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 3 क्विंटल झाली. या शेंगांना 8 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक 440 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 15 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 2 हजार रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 2000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,800 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.

बटाटा : एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,600 रुपये, भाव क्रमांक 3. 1,200 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो : 290 क्विंटल (2,500 ते 3,500 रुपये), कोबी – 180 क्विंटल ( 1,000 ते 1,500), फ्लॉवर – 200 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी – 106 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी – 94 क्विंटल (2,000 ते 3,000), दोडका – 72 क्विंटल (2,000 ते 3,000), कारली – 82 क्विंटल (2,500 ते 3,500), दुधी भोपळा – 55 क्विंटल (1,000 ते 2,500), काकडी – 112 क्विंटल (500 ते 1,000), फरशी – 52 क्विंटल (2,000 ते 4,000), वालवड – 74 क्विंटल (2,000 ते 4,000), गवार – 56 क्विंटल (4,000 ते 6,000), ढोबळी मिरची – 190 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 35 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 100 क्विंटल (5,000 ते 6,000), शेवगा – 40 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 115 क्विंटल (1,500 ते 2,500).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 24 हजार 590 जुड्या (500 ते 700 रुपये), कोथिंबीर – एकूण 40 हजार 500 जुड्या (100 ते 400 रुपये), शेपू – एकूण 5 हजार, 900 जुड्या (400 ते 600 रुपये), पालक – एकूण 4 हजार 200 जुड्या (500 ते 800 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 38 जर्शी गायींपैकी 23 गायींची विक्री झाली.(20,000 ते 50,000 रुपये), 105 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली (15,000 ते 30,000 रुपये), 130 म्हशीपैकी 115 म्हशींची विक्री झाली.(30,000 ते 80,000 रु.), 4,150 शेळ्या – मेंढ्यांपैकी 3,720 शेळ्यांची विक्री झाली. (2,000 ते 25,000 रु.).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news