पुणे : टोमॅटोची लाली उतरली; किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो

पुणे : टोमॅटोची लाली उतरली; किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो

पुणे : पुण्याच्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने रविवारी (दि. 4) शेतकर्‍यांनी आपला मोर्चा पुण्याच्या बाजारपेठेकडे वळविला. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. शुक्रवारी टोमॅटोच्या दहा किलोला 150 ते 180 रुपये भाव मिळाला होता. तो रविवारी घसरून 100 ते 140 रुपयांवर पोहोचला. तर, किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू होती.

उन्हाच्या कडाक्यामुळे रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील तरकारी विभागात फळभाज्यांची घटलेली आवक कायम आहे.
बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने लसूण, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, शेवगा व घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

परराज्यांतील कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक मधून 4 टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 5 ते 6 ट्रक मटार, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 12 ते 14 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 गोणी, टोमॅटो 11 हजार क्रेटस्, भुईमुग शेंग 175 ते 200 गोणी, काकडी 7 ते 8 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, गावरान कैरी 100 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदूर, आग्रा आणि गुजरात भागातून बटाट्याची 35 ते 40 ट्रक इतकी आवक झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news