Khadakwasla: पानशेत धरणाच्या सांडव्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू; पाय घसरल्याने दुर्घटना

ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
Khadakwasla News
पानशेत धरणाच्या सांडव्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू; पाय घसरल्याने दुर्घटनाFile Photo
Published on
Updated on

खडकवासला: पानशेत (ता. राजगड) येथे मावस भावाकडे सुटीसाठी आलेल्या चिमुकल्याचा पानशेत धरणाच्या सांडव्यात अंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सोहमलाल लखमाराम रायिका (वय 13, मुळ रा. पाली, राजस्थान), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सोहमलाल हा पानशेत येथे मिठाईचे दुकान असलेल्या रामेश्वर यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी सुटीसाठी आला होता. शुक्रवारी सकाळी तो मित्रांसमवेत अंघोळीसाठी पानशेत -वरसगाव रस्त्यालगतच्या पानशेत धरणाच्या सांडव्यावर गेला होता. पानशेत धरणातून सांडव्यात 581 क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने सांडव्याचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.  (Latest Pune News)

Khadakwasla News
Pune Traffic: वाहतुकीतील बदलामुळे पादचार्‍यांचा जीव मुठीत; फातिमानगर चौकातील चित्र

सोहमलाल याला पोहता येत नसल्याने तो सांडव्यातील खडकावर अंघोळ करीत होता. अंघोळ करताना पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे काही क्षणातच तो खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. मित्रांनी सोहमलाल याला वाचवण्यासाठी जोरदार आरडाओरडा केला. मात्र, जवळपास कोणी निष्णात पोहणारे नसल्याने सोहमलाल याला वाचवता आले नाही.

Khadakwasla News
Pune Airport: टर्मिनलसमोर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चारचाकी थांबवल्यास दंड; पुणे विमानतळ प्रशासनाचा निर्णय

याबाबत माहिती मिळताच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, हवालदार युवराज सोमवंशी यांनी हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्कू पथकाचे गणेश सपकाळ, संजय चोरगे, नीलेश जाधव, नीलेश तारू, उत्तम पिसाळ, सनी माने तसेच स्थानिक पोलिस पाटील राजेंद्र ठाकर, बंटी ठाकर आदींसह घटनास्थळी धाव घेतली.

रेस्कू पथकाने दुपारी खोल पाण्यातून सोहमलालचा मृतदेह बाहेर काढला. नंतर वेल्हे बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांनी सोहमलाल याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी राजस्थान येथे नेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news