

पुणे: अकरावी प्रवेशासाठी 26 मे ते 3 जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, इनहाऊस कोट्यासह अन्य काही बदलांमुळे विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आज गुरुवारी (दि.5) दुपारी 2 वाजेपर्यंत संधी मिळणार आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यात तब्बल 12 लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 435 महाविद्यालयांमध्ये कॅपच्या 18 लाख 97 हजार 526 जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर 2 लाख 25 हजार 514 जागा विविध कोटाअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. (Latest Pune News)
संबंधित दोन्ही जागा मिळून तब्बल 21 लाख 23 हजार 40 जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात 12 लाख 20 हजार 307 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार 26 मे ते 5 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावी वर्गासाठी प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
26 ते 5 जून याच काळात विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येणार आहेत. विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनाक सुधारीत मुदतवाढीसह 5 जून 2025 रोजी दुपारी 2.00 पर्यंत करण्यात येत आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असे देखील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अकरावी प्रवेश नोंदणी प्रक्रिया दृष्टिक्षेपात
नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क
11 लाख 34 हजार 433 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन जमा केलेले आहे.
अर्ज अंतिम करून 11 लाख 20 हजार 372 विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत.
नियमित फेरी अर्थात कॅप राउंडसाठी 10 लाख 7 हजार 366 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.
महाविद्यालयांच्या इनहाऊस कोट्यासाठी 53 हजार 166 विद्यार्ध्यांनी अर्ज केलेले आहेत.
महाविद्यालयांच्या व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोट्यासाठी
26 हजार 586 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.
अल्पसंख्याक कोट्यासाठी
41 हजार 42 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.