पिंपरी : मनिमाऊ पाळण्यासाठी घ्यावा लागणार आता महापालिकेकडून ऑनलाईन परवाना

पिंपरी : मनिमाऊ पाळण्यासाठी घ्यावा लागणार आता महापालिकेकडून ऑनलाईन परवाना
Published on
Updated on

नंदकुमार सातुर्डेकर
पिंपरी : आपल्या सर्वांना लहानपणापासूनच मनिमाऊचे खूपच आकर्षण असते; मात्र आता आपल्याला मनिमाऊ पाळायची असेल, तर महापालिकेकडून त्यासाठी ऑनलाईन परवाना घ्यावा लागणार आहे. मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार मांजर पाळण्यासाठी परवाना लागतोच; मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑनलाईन परवाना द्यायचे ठरविले आहे.

त्याला कारणही तसेच आहे. अनेकांना मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागतो हे माहीत नाही. अनेकांना महापालिकेच्या संबंधित कार्यालयात जाऊन परवाना काढायचा कंटाळा येतो म्हणून महापालिकेने आता ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यायचे ठरविले आहे. त्यामुळे महापालिकेला मांजरांची नसबंदी तसेच साथीच्या आजारांवर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

मांजरांमध्ये आढळणारे आजार व प्रतिबंधात्मक उपाय
मांजरांमध्ये व्हायरल आजार हे प्रामुख्याने फेलाइन पॅनलयुको पॅनिया (पचन संस्थेचा आजार), फेलाईन कॅल्सी व्हायरस, फेलाईन हायनो ट्रकियाटीज (श्वसन संस्थेचा आजार) या तीन प्रकारचे आजार आढळतात. या आजारांमध्ये त्वरित उपचार न झाल्यास मांजर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे मांजरांना वयाच्या 45 व्या दिवशी 'थ—ी इन वन' लसीकरण करणे महत्त्वाचे असते.

पावसाळ्यामध्ये श्वास घेण्यास होतो त्रास
पावसाळ्यामध्ये फेलाईन हायनो ट्रकियाटीज तसेच फेलाइन पॅनलयुको पॅनिया या आजारांचा संसर्ग वाढला आहे. फेलाईन हायनो ट्रकियाटीज हा श्वसन संस्थेचा आजार असून, यामध्ये मांजरांना श्वास घेण्यास त्रास होणे, नाकामधून स्त्राव वाहणे अशी लक्षणे दिसतात.

मांजरांमुळे माणसाला होणारे आजार
मांजराच्या अतिसंपर्कात आल्यास गर्भवती स्त्रियांना टॉरजोप्लाजमा गोंडाय हा आजार होतो. त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो.
कॅट्स स्क्रॅच या आजारात मांजराने मारलेल्या नखांमुळे शरीराला इन्फेक्शन होऊ शकते
मांजर चावल्यास रेबीज होऊ शकतो.

मांजरीसाठी लागणार्‍या वस्तूंची बाजारपेठ
एकेकाळी भारतीय मांजरांचा रुबाब होता. या माजरांना दूध, मासे, चपाती खायला दिले जायचे. मात्र, आता पार्शियन मांजर पाळणारांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी खास रेडिमेड खाद्य बाजारात आले आहे. पिल्लांना वेगळे व मोठ्या मांजरांना वेगळे मल्टी विटामिन व प्रोटीन असलेले खाद्य, टॉनिक्स, बाजारात उपलब्ध आहे; तसेच शाम्पू, टॉयलेट ट्रे, मांजराला फिरायला नेण्यासाठी पारदर्शक बॅग, दोरीची खेळणी, बॉल आदी वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

  • मांजरांची ऑनलाइन नोंदणी झाल्यास महापालिकेकडे त्याचा डाटा उपलब्ध होईल. शहरांमध्ये भटक्या मांजरांचे प्रमाण वाढले आहे. एक मादी मांजर साधारणपणे वर्षाला 12 ते 13 पिल्लांना जन्म देते; मात्र त्यांचा सांभाळ नीट होत नाही. रस्त्यातील अपघात तसेच कुर्त्र्यांची शिकार होऊन अनेक मांजर मृत्युमुखी पडतात. मांजरांची ऑनलाइन नोंदणी झाल्यास महापालिकेकडे त्याचा डाटा उपलब्ध होईल. नसबंदी केल्यास भटक्या मांजरांच्या संख्येवर आळा घालता येईल.

पंचनसंस्थेचा विकार असून मांजरांना उलट्या होणे, रक्ताची पातळ विष्ठा, कमकुवतपणा येणे अशी लक्षणे आढळून येतात. तसेच मांजरांमध्ये वयाच्या 10 व्या दिवशी अ‍ॅन्टिरेबीजची लस ही (बूस्टर डोस) सोबत दिले पाहिजे. या दोन्ही लस अत्यंत महत्त्वाच्या असून प्रत्येक वर्षाला त्यांना डोस दिला पाहिजे.
                                                               – डॉ. महेश पवार
                                       पशुशल्यचिकित्सक, पिंपरी-चिंचवड महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news