पोलिसांना चकवा देण्याचा आरोपीचा प्रयत्न अपयशी; इंदापूर न्यायालयासमोरील घटना

पोलिसांना चकवा देण्याचा आरोपीचा प्रयत्न अपयशी; इंदापूर न्यायालयासमोरील घटना
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : अटकेतील आरोपी न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयातून बाहेर आणताना पोलिसांना गुंगारा देऊन पळाला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडल्याने हा प्रयत्न फसला. इंदापूर शहरात ही घटना घडली. ओंकार विजय ननवरे (वय 23, रा. भवानीनगर, सणसर, ता. इंदापूर )असे आरोपीचे नाव असून, त्यास इंदापूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भवानीनगर येथील विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 18 ऑगस्ट रोजी पळवून नेले. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी ती महिला मिळून आली. मात्र, आरोपी अनैतिक संबंधाचे व्हिडिओ व अश्लील फोटो व्हायरल करून बदनामी करेल, अशी धमकी देत महिलेच्या पतीला पाच लाख रुपयांची खंडणी व जिवे मारण्याची धमकी देत होता. आरोपी ननवरे याला पुरंदर तालुक्यातील सासवड भागातील झेंडेवाडी येथून ताब्यात घेऊन नातेपुते येथील त्याची चोरीची मोटारसायकल क्र. एम. एच. 45 एच. 3789 जप्त केली होती.

गुरुवारी (दि. 8) सायंकाळच्या दरम्यान वालचंदनगरचे सहायक पोलिस उपनिरीक्षक गोरख कसपटे, हवालदार अजित थोरात, जी. बी. पाटील हे आरोपीला इंदापूर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यास येरवडा येथील कारागृहात दाखल करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीला घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने मारुती मंदिराजवळ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news