मात्र, प्रस्तावास विलंब झाला असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी पहिल्या सहा महिन्यानंतर बदल्यांचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हा प्रस्ताव ठेवण्यास पुन्हा विलंब झाल्याने गतवर्षी बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी मात्र महापालिका कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया झाली. त्यानुसार आता शिक्षकांच्या आणि इतर कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे त्यास मुहूर्त मिळाला नव्हता. आता प्रशासनाकडून 150 मुख्याध्यापक आणि जवळपास दोनशेहून अधिक शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता नियमित, विनंती अर्ज आणि विषयानुरूप बदल्या यांची प्रक्रिया पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.