पुणे : सराईत चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त

पुणे : सराईत चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त

पुणे : सिंहगड रस्ता भागात दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या सराईताला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिषेक दशरथ वाघमारे (22, रा. दांडेकर पूल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सिंहगड रोड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान कॅनॉल रस्ता परिसरातून एक संशयित दुचाकीस्वार येत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

त्यानुसार पोलिसांनी वाघमारे याची दुचाकी अडविली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सिंहगड रस्ता परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार वाघमारेला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news