

पुणे: गत पन्नास दिवस देशभर यंदा उष्णतेची लाट सक्रिय होती त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले बाष्पीभवनाचा वेग ही वाढल्याने संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत तसेच अंदमानच्या सगरात मान्सून तयारीला लागला आहे तेथे तो २०मे च्या सुमारास तर केरळमध्ये ३० मे ते १ जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
गत २४ तासांत देशातील वातावरण बदलले असून सर्वत्र मान्सून पावसाचे वातावरण तयार झाल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.त्यामुळे गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रातून रज्यात वारे वाहत असून अंदमानच्या सागरात मान्सून तयारीला लागल्याचे वृत्त आहे. (latest pune news)
यंदा अंदमनात मानसून २०मे च्या आसपास तर केरळमध्ये ३० मे ते १ जूनच्या आसपास दाखल होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रसपाटी जवळ सध्या हवेचे दाब जास्त असून ते जमिनीकडे कमी आहेत त्यामुळे वाऱ्याचा वेग समुद्राकडून जमिनीकडे जास्त वेगाने सुरू झाला आहे.