चाकण परिषदेच्या वाढीव करात दुरुस्ती होणार

चाकण परिषदेच्या वाढीव करात दुरुस्ती होणार
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या करवाढीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, पुणे नगररचना विभागाचे सहायक संचालक तसेच नगरपरिषद पदाधिकारी यांच्यात शुक्रवारी (दि. 3) बैठक पार पडली. बैठकीला प्रशासकीय अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत करवाढीत तत्काळ बदल करण्याचे आश्वासन दिले.

चाकण नगरपरिषद हद्दीतील मिळकतधारकांना घरपट्टी, नळपट्टीबाबत देयके देण्यात आली आहेत. येत्या 31 मार्चअखेर ही देयके भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेने दिलेल्या देयकात यंदा प्रथमच शिक्षण कर लावण्यात आला आहे. तोदेखील मोठ्या प्रमाणावर लावल्याचा आरोप मिळकतधारकांनी केला. नगरपरिषदेने केलेली करवाढ अन्यायकारक असून, ती दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते.

त्यावर शुक्रवारी (दि. 3) मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने पुणे नगररचना विभागाचे सहायक संचालक अभिजित केतकर यांच्याकडे माजी खासदार शिवाजीराव अढळराव-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. बैठकीत करवाढीसंदर्भात सुचवलेले बदल कमी करण्यास केतकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ बदल करण्याचे आश्वासन दिल्याचे गोरे यांनी सांगितले. शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, चाकणचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक निलेश गोरे, प्रवीण गोरे, सामाजिक कार्यकर्ते बिपीन रासकर, रोनक गोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

पाण्याचा मिळणार अधिकचा कोटा
चाकण शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा तसेच पाण्याचा कोटा वाढवून देण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिलेल्या निवेदनावर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शहरासाठी तत्काळ पाण्याचा कोटा वाढवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने दिले. तसेच संबंधित अधिकार्‍यांना पाणी पुरवठ्यासंदर्भात आदेशही दिले आहेत, असे गोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news