

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : विविध दाखले त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी देहू नगरपंचायतीने लाखो रुपये खर्च करुन घेतलेली किऑस मशिन सॉफ्टवेअर अपडेट अभावी आठ ते नऊ महिन्यांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे या मशीन अवस्था असून अडचण अन नसून खोळंबा अशी अवस्था आहे. देहू परिसरातील नागरिकांना 8 अ चा उतारा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसह इतर आवश्यक दाखले सहज उपलब्ध व्हावेत यासाठी आठ महिन्यांपूर्वी सुमारे सहा लाख रुपये खर्च करुन देहू नगरपंचायतीने किऑस मशीन खरेदी केली. होती. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्यांना आवश्यक असणारी कागदपत्र विनाविलंब मिळावेत यासाठी घेण्यात आलेली
मशीन सॉफ्टवेअर अपडेट
अभावी नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये पडून आहे. त्यामुळे लवकरात लवकर किऑस मशिन सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.