चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे (ता. खेड) येथील कंपनीतील 32 लाख 92 हजार रुपये किंमतीचा माल चोरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. याबाबत काळूराम बच्चे (वय 27) यांनी महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे.
रंजन परिदा, (वय 35, रा.महाळुंगे),किरण कच्छवे (वय 28,रा. चाकण, ता.खेड) व शिशुपालसिंग अजरबिहारी, (वय 22, रा महाळुंगे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाळुंगे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
. फिर्यादी यांच्या पॅरामाउंट पॉलीमर्स या कंपनीमधून आरोपींनी संगनमताने कॉपर मेटल 950 किलो व निकेल मेटल 900 किलो असा एकूण 32 लाख 92 हजार रुपये किंमतीचा माल फेब—ुवारी ते ऑगस्ट दरम्यान चोरून नेला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.