

सुवर्णा चव्हाण
पुणे: c
त्यात नाट्यनिर्मितीचा खर्च जास्त असल्यामुळे निर्माते नाट्यनिर्मितीची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शंभर टक्के असणारी नाट्यनिर्मिती आता 30 टक्क्यांवर आली आहे. पुण्यात नवोदितांनी पुढाकार घेऊन नवीन नाटकांची निर्मिती करावी, अशी अपेक्षा पुण्यातील जुन्या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. (Latest Pune News)
पुणे म्हणजे नाटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याच्या रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग होत आहेतच; त्याला प्रतिसादही चांगला आहे. पुण्यात मुंबईच्या निर्मात्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होत आहेत.
नामवंत सेलिब्रिटींचा सहभाग असल्यामुळे मुंबईच्या निर्मात्यांची नाटके पुण्यात गाजत आहेत. त्याउलट पुण्यामध्ये होणारी नवीन नाट्यनिर्मिती थांबल्यातच जमा आहे. पूर्वी पुण्यामध्ये 15 ते 20 वर्षांपूर्वी पुण्यात 15 ते 20 नाट्यनिर्माते होते. पण, आज ही संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.
निर्मात्यांची नवीन फळी नसणे, तरुण निर्मात्यांचा पुढाकार नसणे, नाट्यनिर्मिती खर्चिक बाब असणे अशा विविध कारणांमुळे पुण्यात नाट्य निर्मितीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पुण्यातील रंगभूमी बहरावी आणि नवोदित कलाकारांनी पुढाकार घेऊन नाट्य निर्मितीला बळ द्यावे, अशी इच्छा जुन्या निर्मात्यांनी व्यक्त केली.
नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर म्हणाले, पूर्वी पुण्यात नवीन नाटकांची निर्मिती करणारी निर्मात्यांची एक फळी होती. पण, हे चित्र आज राहिलेले नाहीत. आज नाटक हे खर्चिक बाब बनली आहे. तो खर्च निर्मात्यांना परवडणारा नाही. त्यामुळे ही नाट्यनिर्मिती थांबली आहे. त्याशिवाय बरेच कलाकार मुंबईत वास्तव्यास आहे, हेही मुख्य कारण आहे नाट्यनिर्मिती थांबण्याचे.
त्याशिवाय तरुण कलाकार, तरुण लेखक आणि निर्मात्यांचा पुण्यात अभाव आहे. प्रायोजक हे सेलिब्रिटींना महत्त्व देतात. पुण्यातील नाटकांमध्ये सेलिब्रिटींचा अभाव असल्यामुळे मुबंईच्या निर्मात्यांना जसे प्रायोजक मिळते तसे पुण्यातील निर्मात्यांना मिळत नाही, हेही एक प्रमुख कारण आहे. हे चित्र बदलायला हवे. नवोदित कलाकारांनी पुढे येऊन जोखीम पत्करून नाट्यनिर्मिती करावी. निर्मात्यांची नवीन फळी पुण्यात तयार झाली पाहिजे.
पूर्वी नाट्यनिर्मात्यांची मोठी फळी पुण्यात होती. भालचंद्र पानसे, विजय जोशी, अविनाश देशमुख, शेखर लोहकरे यांच्यासह विविध नाट्य संस्थांनी पुण्याची रंगभूमी गाजवली. पण, आता आम्ही काही मोजकेच निर्माते नाट्यनिर्मिती करीत आहोत. मुंबईच्या निर्मात्यांना पुण्यात नाटक करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. पण, पुण्यातील निर्मात्यांना इतर ठिकाणी प्रयोग करण्याचा खर्च परवडणारा नाही किंवा पुण्यातही एक प्रयोग सादर करायला एक ते दीड लाख रुपये लागतात. तो खर्च निर्मात्यांना परवडणारा नाही. पुण्यातील तरुणांनी पुढाकार घेऊन नाट्यनिर्मिती करावी, नवीन व्यावासायिक नाटक रंगभूमीवर आणावे आणि योगदान द्यावे. तरुणांनीही व्यावसायिक नाटकांकडे वळले पाहिजे.
- भाग्यश्री देसाई, पुण्यातील नाट्यनिर्मात्या