पुणे : ‘पंतप्रधान आवास’चे काम अंतिम टप्प्यात; लाभार्थ्यांना मार्चपूर्वी ताबा मिळणार!

पुणे : ‘पंतप्रधान आवास’चे काम अंतिम टप्प्यात; लाभार्थ्यांना मार्चपूर्वी ताबा मिळणार!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेकडून वडगाव खुर्द येथे उभारण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील सदनिका ताब्यात देण्याची मुदत मार्चपर्यंत आहे, मात्र त्यापूर्वीच ताबा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात 8 हजारांहून अधिक सदनिका निर्माण करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हडपसर स. नं. 106 अ, व 17 अ (340 सदनिका), हडपसर स.नं. 89 (584 सदनिका), हडपसर स. नं. 106 अ 12 (100 सदनिका), खराडी स. नं. 57-5 (786 सदनिका) आणि वडगाव खुर्द स. नं. 39 (1108 सदनिका) अशा पाच ठिकाणी एकूण 2918 सदनिका निर्मिण करण्यात येत आहेत.

वडगाव खुर्द येथे 12 मजली 8 इमारती उभारण्यात आल्या आहेत. योजनेतील सदनिकांची सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी अति. आयुक्त बिनवडे यांच्यासह शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, भाउसाहेब गवळी, श्रीकांत वायदंडे, राहुल साळुंके, राजश्री शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वडगाव येथील प्रकल्पातील आठही 12 मजली इमारतींचे काम मार्च 2023 पूर्वी पूर्ण करून 1 हजार 108 सदनिका नागरिकांच्या स्वाधीन करण्यात येतील. याठिकाणी प्रत्येक इमारतीला दोन लिफ्ट, दुचाकी पार्किंग, मैलापाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अभ्यासिका, रिक्रिएशन सेंटर, बालोद्यान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत देशभरात राबविण्यात येणार्‍या गृहप्रकल्पांमध्ये महापालिकेने उभारण्यात आलेला प्रकल्प हा पथदर्शी ठरेल.

                                                           – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news