पुणे : मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली

File photo
File photo

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मेट्रोच्या पिलरसाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना शिवाजीनगर येथे महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यामुळे गणेशखिंड रस्ता परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर परिसरात काम सुरू आहे. हवामान विभागाच्या कार्यालयाजवळ मेट्रोच्या पिलरसाठी खोदकाम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी 27 इंच व्यासाची मोठी जलवाहिनी फुटली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या घटनेची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळल्यानंतर या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या जलवाहिनीद्वारे लष्कर जल केंद्रातून ससून रुग्णालय, जुना बाजार, गणेशखिंड या भागांना पाणीपुरवठा केला जातो. याच जलवाहिनीतून शिमला ऑफिसच्या भागातून मुंबई-पुणे जुन्या महामार्गासाठी स्वतंत्र जोड दिलेला आहे. त्यामुळे या परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा विस्कळीत का झाला? हे नागरिकांना कळू शकले नाही. सोशल मीडियावर महापालिकेच्या टि्वटर, फेसबुक खात्याद्वारे जलवाहिनी फुटल्याने गणेशखिंड रस्त्याच्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, तो कधी पूर्ववत होणार, याची माहिती दिली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news