

पुणे: क्रिकेट शौकिनांमध्ये उत्सुकता असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचा थरार आजपासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे या मैदानावर रंगणार आहे. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेला उद्यापासून (दि. 5 जून) प्रारंभ होणार असून एमपीएल आणि डब्लूएमपीएल या दोन्ही स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी गहुंजे स्टेडियममध्ये रंगणार आहे.
अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची उपस्थिती आणि नेत्रदीपक ड्रोन शो ही उद्घाटन समारंभाची खास आकर्षणे ठरणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांमधील नामवंत व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत. (Latest Pune News)
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, सामान्य क्रिकेट प्रेमींना या स्पर्धेचा आनंद घेता यावा याकरिता सर्वांना सर्व सामन्यांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहे. तसेच, प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुणवान व उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे. सलामीला रत्नागिरी जेट्स विरुद्ध इगल नाशिक टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.