लोणावळा : वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा अटकेत

file photo
file photo

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांनी पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान वस्तू लंपास करणार्या चोरट्याच्या अवघ्या तीन तासांत मुसक्या अवळण्याची कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मळवली, कार्ला, भाजे परिसरात चोरीच्या घटना

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अखिल सलीम व्होरा (वय 32, रा. नुतननगर, गुजरात) असे आहे. लोणावळा परीसरात जुने पुणे-मुंबई महामार्गावर तसेच मळवली, कार्ला, भाजे परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. शनिवार भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परिसरामध्ये पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तू चोरटे चोरून नेत असल्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या.
त्या तक्रारींच्या अनुषंगाने सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार नितेश कवडे व पोलिस नाईक गणेश होळकर यांचे पथक तपासासाठी तयार करण्यात
आले होते.

12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कारचालक अखिल सलीम व्होरा यांच्या कारची झडती घेतली असता सीमकार्ड नसलेले 6 मोबाईल, तसेच 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, 22 हजार 900 व इनोव्हा कार असा एकुण 12 लाख 11 हजार 100 रुपयांचा माल मिळुन आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद

या पथकाने घटनेच्या अनुषंगाने मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये एका इनोव्हा कारमधून आलेला एक व्यक्ती चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना दिसून आला. पोलिसांनी संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना काळ्या काचा असणारी इनोव्हा कार (जीजे 06 एफसी 3806) ही भाजे धबधबा नंबर 2 परिसरात संशयीत रित्या फिरत असताना दिसून आली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news