

दौंड: दौंड शहरात खासगी सावकारी प्रकरणी दौंड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार) बंटी उर्फ राजेश शामराव जाधव, व त्याचा मुलगा रितेश राजेश जाधव (दोघेही रा. फादर हायस्कूल शेजारी दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील किरणा दुकान चालवणारे अनिकेत रामदास बोरकर (वय ३०) वर्ष यांनी १९/५/२५ रोजी बंटी उर्फ राजेश जाधव यांच्याकडे त्यांची क्रेटा गाडी ही तीन लाख रुपये पाच टक्के दराने घेऊन गहाण ठेवली होती व वेळोवेळी त्यांचे हप्ते देत होते परंतु 22 /6 /२५ रोजी रितेश जाधव हा फिर्यादी अनिकेत बोरकर यांच्याकडे गेला व म्हणाला तू पाठवलेले पैसे माझ्या वडिलांच्या खात्यावर आले नाहीत असे म्हणून त्याला लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड केले महान केली. (Latest Pune News)
यामध्ये त्याला डोक्यातून मानेवर जबर मारहाण केली व खिशातील 3200 काढले व राहिलेले 11800 रुपये लगेच आणून दे नाहीतर तुझी क्रेटा गाडी जाळून टाकीन अशी धमकी दिली.
एकंदरीत दौंड शहरात खासगी सावकारी जोरात सुरू असून सावकारांच्या गुंडागर्दी व दहशतीला घाबरून अनेक जण तक्रार देत नाहीत. तक्रार झाली तर ताडतडीने ती मिटवण्याकरिता काहीजण तयारच असतात याचे सर्व माहिती पोलिसांना आहे परंतु या खाजगी सावकार यावर कारवाई मात्र होत नाही.