तुकोबारायांचे मंदिर अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

तुकोबारायांचे मंदिर अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

वडगाव मावळ : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर उभारण्यात येणारा जगद्गुरु संत तुकोबारायांचे भव्य दिव्य मंदिर पुढील अनेक पिढ्यांसाठी अध्यात्म, संस्कृती आणि संस्काराची दिशा देणारे ठरेल व या पवित्रभूमीचा जगभरात नावलौकिक होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे साधनास्थळ असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य मंदिराची उभारणी केली जात असून, या निर्माणाधीन मंदिरास प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिर निर्माणाच्या कामाची पाहणी केली. तसेच, त्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची आरतीही करण्यात आली.

या वेळी माजी मंत्री संजय भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप पंकजमहाराज गावडे, विक्रांत पाटील, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, विजयराव जगताप, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, दिलीप वेडे पाटील, डॉ. ताराचंद कराळे आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी मंदिर निर्माणाची माहिती घेतली. भव्यदिव्य मंदिर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अध्यात्म, संस्कृती आणि संस्काराची दिशा देणारे ठरेल. तसेच, मंदिराच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील या पवित्र भूमिचा जगभरात नावलौकीक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news