पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान घटले, उकाडा कायम

पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान घटले, उकाडा कायम
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान गेली पंधरा दिवस 39 ते 41 अंशाच्या दरम्यान होते. गुरुवारी (दि.25) रोजी शहराचे कमाल तापमान 36 अंश इतके नोंदविले गेले. मात्र, तापमानात घट होऊनही उकाडा तसाच आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात 41 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी तापमान 5 अंशांनी कमी झाले.

पण दुपारी कमालीचा उकाडा जाणवत आहे. घरात आणि कार्यालयातील वातानुकुलित यंत्रणेचा वेग कमी झालेला नाही. दुपारी कामानिमित्त व खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. तर घरात असणार्‍यांची घामाघूम अवस्था होत आहे. उकाड्याने हैराण परिस्थितीत शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान बालके यांना त्रास सहन करावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news