

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मानाच्या शिखर काठ्या जेजुरी गडावर दाखल झाल्या आहेत. सुपे येथील मानाची असणारी खैरे यांची शिखर काठी मंदिराला टेकवून देव भेट केली.
रविवारी (दि. २५) सकाळी साडे दहा वाजता सुपे येथील खैरे यांच्या शिखर काठीचे वाजतगाजत आगमन झाले. मंदिरासमोरील कासवावर काठ्या नाचवून मंदिराला या शिखर काठ्या टेकवून देवभेट करण्यात आली. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविकांनी भंडारा उधळून जल्लोष केला. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी देवसंस्थानच्या वतीने मानकरी यांचा सन्मान करण्यात आला. दुपारी तीन वाजता संगमनेर येथील होलम राजाच्या शिखर काठ्याची देव भेट होणार आहे.
हेही वाचा