हे मतदार घरातूनच करणार मतदान : पुणे पॅटर्न देशभर होणार लागू

हे मतदार घरातूनच करणार मतदान : पुणे पॅटर्न देशभर होणार लागू
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आणि शारीरिक विकलांग असलेल्या मतदारांना घरातून मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी 550 मतदारांनी मतदानाचा हक्क घरातून बजावला. आता ही सुविधा आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरातून मतदानाचा 'पुणे पॅटर्न' देशभर लागू करण्यात आला आहे.

राज्यात 80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 26 लाख 70 हजार मतदार आहेत. जिल्ह्यातील त्यांची संख्या 2 लाख 48 हजार 525 एवढी आहे. राज्यात 5 लाख 90 हजार दिव्यांग मतदार असून, जिल्ह्यात त्यांची संख्या 85 हजार 200 एवढी आहेत. त्यामुळे घरातून मतदान करणार्‍यांची संख्या आता जवळपास 3 लाख 34 हजार इतकी होणार आहे. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास इतर मतदारांना विशेत: तरुणांना प्रोत्साहन मिळेल. मात्र, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, अशा मतदारांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा शुक्रवारी आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी देशपांडे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 80 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणार्‍या संबंधित नागरिकांना '12-ड' हा अर्ज घरी जाऊन दिला जाणार आहे. हा अर्ज भरून घेतला जाईल. अर्जात संबंधित नागरिकांकडून घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल.

आयोगाकडून राज्याचा आढावा

पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचा आढावा त्यात घेतला जाईल. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि निवडणूक काळातील राज्य आणि केंद्र उत्पादन शुल्क, अमली पदार्थ, मद्य आणि रोकडविरोधी यंत्रणा, भारतीय विमानतळ प्राधिकरण, वस्तू व सेवा कर विभाग अशा 22 यंत्रणांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news