इंदापूर : लाखेवाडीतील दरोड्याचा लागला छडा; दोघे दरोडेखोर जेरबंद

इंदापूर : लाखेवाडीतील दरोड्याचा लागला छडा; दोघे दरोडेखोर जेरबंद
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे 27 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अशोक कुबडे यांच्या घरावर अज्ञातांनी सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 33 हजार रुपयांचा माल पळविला होता. याबाबत इंदापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. अखेर या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

रिजवान ऊर्फ रियाज सुलेमान जहागीरदार (वय 22, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) व प्रवीण ऊर्फ डागर छगन भोसले (वय 20, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत. या घटनेच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना केल्या होत्या. यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आशयाने या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्यांना इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूरचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, ज्ञानेश्वर धनवे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे आदींनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news