बारामती : कठीण पुलाजवळ रस्त्याची चाळण

बारामती : कठीण पुलाजवळ रस्त्याची चाळण
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती-निरा या राज्यमार्गावर कोर्‍हाळे बुद्रुक, कठीण पूल, स्मशानभूमी परिसर, 15 फाटा आणि पेशवे वस्ती येथे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले असून, तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. कोर्‍हाळे येथील पेशवेवस्ती, माध्यमिक विद्यालय, कठीण पूल येथे वारंवार खड्डे पडत आहेत. रस्त्याचे दर्जेदार काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नुकताच वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे ते ढोलेवस्ती या रस्त्याचे काम पूर्ण झाले, त्यामुळे या ठिकाणी असलेली अतिक्रमणे बाजूला केल्यामुळे येथील प्रवास सुखकर झाला आहे.

याप्रमाणे कोर्‍हाळे येथीलही रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे. बारामती-निरा मार्गावर सर्वाधिक गतिरोधकांमुळे प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावरील उसाची धोकादायक वाहतूक कमी होताना दिसत नाही. याच मार्गावर एसटीच्या सर्वाधिक फेर्‍या होत असल्याने एसटीला उत्पन्नही जास्तीचे मिळते. मात्र, सुविधा देण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे. सध्या माळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी होते.

नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून या ठिकाणी कोणत्याही सूचनांचे फलक अथवा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. याशिवाय करंजेपूल, वडगाव निंबाळकर, खामगळपाटी, पणदरे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने अगोदरच रहदारीसाठी धोकादायक बनलेल्या रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. जीवघेणा प्रवास सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news