

पुणे: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जीएमआरटी प्रकल्पाजवळून जाण्यास विरोध झाल्याने तो नगरमार्गे नेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे प्रवासाचा वाढणारा वेळ तसेच नारायणगाव-सिन्नर भागातील नागरिकांना बसणारा फटका लक्षात घेता जीएमआरटीला त्रास होणार नाही, अशा बेताने थोडा लांबून जुन्याच नियोजनानुसार रेल्वेमार्ग व्हावा, असा सुवर्णमध्य सुचवण्यात येतो आहे. यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत नागरी रेटा नेण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम, असंख्य रेल्वे प्रकल्प हाती असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून वेळेत पूर्ण होणार का? राज्यशासनाने नेमलेली संस्था काय करणार? पुणे-नाशिकचा मार्ग फिरता असणार की, पूर्वीप्रमाणेच सरळ, थेट असणार, असे अनेक प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडले आहेत.
मात्र, असे असले तरी या प्रकल्पासाठी आता उशीर करू नका, आमचा प्रवासाचा वेळ वाढवू नका, जनतेचा खर्च वाढवू नका, पूर्वीच्याच मार्गाने थेट नियोजन करा, अशी मागणीही प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड मार्गाचा प्रकल्प गेली अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या मार्गाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर या प्रकल्पाचा वेग वाढला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात जीएमआरटी भागात अडथळा आला. येथील संशोधनात अडथळा येत असल्याचे कारण देत शास्त्रज्ञांनी याला विरोध केला. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेत त्यात दुरुस्ती करण्याचे नियोजन केले.
तसेच, त्यानंतर हा प्रकल्प रेल्वेकडूनच करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातही हा मार्ग पूर्वीप्रमाणे सरळ न जाता फिरून जात असल्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढत आहे. यामुळे प्रवासी आणि लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, हा मार्ग पूर्वी ठरल्याप्रमाणेच आणि राज्य शासनाच्या कंपनीकडूनच व्हावा, अशी मागणी केली जात आहे.
पुणे-नाशिक सरळ मार्गाने रेल्वे व्हावी, याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये मागील अधिवेशन काळात रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन, जीएमआरटी, रेल्वे यांची एकत्रित बैठक होण्यासंदर्भात विनंती केली. अगोदर महारेल हा प्रकल्प करणार होते, आता सेंट्रल रेल्वे करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे, असे काही लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
महारेल या कंपनीची मूळ स्थापनाच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्याच कार्यकाळात झाली आहे. आता फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ’महारेल’ला टाळून हा प्रकल्प होत आहे. आम्ही याबाबत जीएमआरटीशी संयुक्त मीटिंग करण्याची मागणी केली आहे. याची बैठक नियोजित आहे. यात निर्णय होईल. मात्र, पूर्वीच्या मार्गाने महारेलकडून हा प्रकल्प झाल्यास या मार्गावरील औद्योगिक पट्टा आणि शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच हा प्रकल्प व्हावा, अशीही त्यांची मागणी आहे.
करण्यात आला आहे. यानुसार पहिला पर्याय नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे असा हायस्पीड मार्ग विकसित करणे आणि दुसरा पर्याय दौंड- अहिल्यानगर-मनमाड या मार्गाशी समांतर स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करणे, असे दोन पर्याय आहेत. परंतु, याला विरोध असल्याचे समोर येत आहे.
पूर्वीच्या प्रकल्पानुसार असा आहे पुणे-नाशिक मार्ग
पुणे-नाशिक जुन्या प्रकल्पातील रेल्वे हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार होती. चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा, संगमनेरला प्रमुख स्थानके होती.
राज्य शासनाकडील पूर्वीच्या प्रकल्प अहवालाची माहिती
पूर्वी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राज्य शासन संचालित ‘महारेल’कडून करण्याचे नियोजन होते. 235 कि.मी.चा हा प्रकल्प 1200 दिवसांत म्हणजेच तीन वर्षांत पूर्ण केला जाणार होता. याकरिता 16 हजार कोटींपर्यंत खर्च येणार होता. मात्र, हा प्रकल्प दिवसेंदिवस रखडत असल्यामुळे याला आता 25 हजार कोटींपर्यंत खर्च येणार आहे. वर्ष सरले की, या खर्चात वाढ होत आहे, यामुळे या प्रकल्पाला आता गती देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
रेल्वेचे नियोजन...
रेल्वे प्रशासनाकडून पुणे-नाशिक रेल्वेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे नियोजन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे विभाग या मार्गासाठी दोन पर्याय निवडण्याची शक्यता आहे. आणि हे पर्याय प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ खाणारे आहेत, असा आरोप लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांकडून
करण्यात आला आहे. यानुसार पहिला पर्याय नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे असा हायस्पीड मार्ग विकसित करणे आणि दुसरा पर्याय दौंड- अहिल्यानगर-मनमाड या मार्गाशी समांतर स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करणे, असे दोन पर्याय आहेत. परंतु, याला विरोध असल्याचे समोर येत आहे.
पूर्वीच्या प्रकल्पानुसार असा आहे पुणे-नाशिक मार्ग
पुणे-नाशिक जुन्या प्रकल्पातील रेल्वे हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार होती. चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा, संगमनेरला प्रमुख स्थानके होती.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड मार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे. यात रेल्वेने कोणतीही फिरवा-फिरवी करू नये. अहिल्यानगरसाठी जाणारा नवा मार्गसुध्दा दौंडवरूनच जाणार आहे, असे न करता, हे दोन्ही मार्ग सरळ मार्गानेच जायला हवेत, याकरिता आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्र आलो आहोत. अधिवेशनानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी आणि रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
- सत्यजीत तांबे, आमदार, नाशिक
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम आम्हीच करणार आहे. याबाबत आम्हाला वरिष्ठ पातळीवरून मिळालेली प्राथमिक माहिती आहे. या प्रकल्पाबाबत वरिष्ठ पातळीवर जसे नियोजन असेल, त्याप्रमाणेच होईल.
- राजेशकुमार यादव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग
जायचंय देवाच्या आळंदीला अन् तयारी चोराच्या आळंदीची, असे काम पुणे-नाशिक रेल्वेबाबत रेल्वे प्रशासन करत आहे, हे अत्यंत चुकीचे असून, रेल्वेने पूर्वी मंजूर झालेल्या मार्गानेच गाडी न्यावी. कोणालाही खुश करण्यासाठी रेल्वेने गाडी फिरवून नेऊ नये. जनतेचा अधिकचा पैसा खर्च करू नये. कमी अंतरावरून पुणे रेल्वे नाशिक रेल्वे सुरू करावी.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप