गोड-रसाळ द्राक्षांची स्वस्ताई !

गोड-रसाळ द्राक्षांची स्वस्ताई !

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

शंकर कवडे :

पुणे : लहरी हवामानामुळे महिनाभर द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला. त्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांच्या दर्जात घसरण झाली आहे. पुण्यातील घाऊक फळबाजारात दररोज टनांच्या स्वरूपात द्राक्षे दाखल होत आहेत. रमजानचा महिना. त्यात आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने द्राक्षांना मागणी नाही. परिणामी, किरकोळ बाजारात गोड-रसाळ द्राक्षांचे भाव 50 ते 80 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात येणार्‍या द्राक्षांचे सत्तर ते पंचाहत्तर टक्के उत्पादन एकट्या सांगली जिल्ह्यात होते. तर, उर्वरित द्राक्षे सोलापूर, इंदापूर व बारामती भागातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दाखल होतात. यंदा द्राक्षांचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात मुबलक द्राक्षे उपलब्ध आहेत. रमजानमुळे कलिंगड, खरबूज, पपई व आंब्याला उठाव आहे. त्या तुलनेत मागणी नसल्याने द्राक्षांचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आल्याची माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_title" view="list" /]

द्राक्षांचे प्रकार

 सोनाका
या फळांचा रंग हा दुधी व पिवळसर असतो. त्याचे मणी कडक व टिकाऊ असतात. या द्राक्षांची लांबीही चांगली असते. त्यामुळे या द्राक्षाला अधिक दर मिळतात.

 आर. के., अनुष्का, एस. एस.
रंगाने ही द्राक्षे दुधी असतात. याचा मधला भाग फुगलेल्या स्वरूपात दिसतो तसेच लांबी जास्त असते. खायला कडक तसेच जास्त काळ टिकतात. गोडीला ही द्राक्षे सोनाकापेक्षा कमी असतात. अनुष्का या द्राक्षाचा आकार काजूसारखा दिसून येतो.

माणिकचमन
द्राक्षांचे हे जुने वाण आहे. ही द्राक्षे लांबीला कमी असतात. त्यांचा पिवळसर रंग असतो. ही द्राक्षे गोडीला चांगली असतात. आकाराने लहान असल्याने या द्राक्षांना कमी दर मिळतो. या द्राक्षांचा मनुक्यांसाठी जास्त वापर केला जातो.

 तास-ए-गणेश
सोनाका व माणिकचमनपेक्षा या द्राक्षांची लांबी जास्त असते तसेच ती आकाराने मोठी अंड्याच्या आकारासारखी दिसून येतात. हिरवट रंगाच्या असलेल्या या द्राक्षांना जास्त रंग दिसून येत नाही. याचा टिकाऊपणा अधिक असतो. सोनाकानंतर चांगला दर मिळणारी ही द्राक्षे दिसून येतात.

थॉमसन
आकाराने ही द्राक्षे गोल व फुगीर असतात. या द्राक्षांची युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येते. या द्राक्षांमधून शेतकर्‍यांना जास्त उत्पादन निघते.

काळ्या द्राक्षाचे प्रकार 

 शरद सीडलेस
द्राक्षांचे हे जुने वाण आहे. ही द्राक्षे आकाराने गोल व लहान असतात. पातळ साल असलेली ही द्राक्षे खायला गोड असतात. या द्राक्षांच्या वाणापासून जास्त उत्पादन मिळते.

 नानासाहेब जम्बो
हाताच्या अंगठ्यासारखा आकार असलेली ही द्राक्षे आकाराने जाड व लांब असतात. काळ्या द्राक्षांमध्ये या द्राक्षांना जास्त दर मिळतो.

 कृष्णा-शरद
या द्राक्षांचा पुढचा भाग चोचीसारखा निमूळता असो. ही द्राक्षे खायला गोड व लांब असतात.

 ज्योती-सरिता
द्राक्षांच्या आतमध्ये ज्योतीसारखे चित्र दिसते. त्यामुळे त्याला ज्योती नावाने ओळखले जाते. आकाराने ही द्राक्षे लांबसडक व जाड असतात. द्राक्षांमध्ये सर्वांत जास्त चालणारे हे वाण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news