Lemon Rate: फेब्रुवारीच लिंबाचे भाव गगनाला भिडले

गोणीमागे 100 ते 150 रुपयांची वाढ : उन्हामुळे आवक घटली
Lemon Rate Hike
फेब्रुवारीच लिंबाचे भाव गगनाला भिडले File Photo
Published on
Updated on

पुणे: फेब्रुवारी महिन्यातच कडाक्याच्या उन्हाची चाहुल लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लिंबाला मागणी वाढली असून, बाजारात घटलेली आवक आणि मागणी यांमध्ये लिंबाचे आत्ताच भाव गगनाला भिडले असल्याची माहिती लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

गुलटेकडी मार्केट यार्डमधील फळ बाजारात लिंबाची केवळ 900 ते 1200 गोणीच आवक झाली असून, प्रतिगोणीला तब्बल 400 ते 1000 रुपये भाव मिळाला आहे. बाजारात आलेल्या लिंबाची आवक ही सोलापूर आणि अहिल्यानगरमधून होत असून, पुणे शहर आणि पिंपरीतून जास्त मागणी आहे.

गेल्या वर्षी उन्हाचा तडाखा मार्चनंतर वाढला होता. त्या पटीने एक महिना आधीच उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाची आवक त्यामानाने घटली असल्याचे रोहन जाधव यांनी सांगितले.सध्या बाजारात आलेल्या लिंबाला गुर्‍हाळचालक, लोणचे करणार्‍या कंपनी आणि घरगुती वापरासाठी अधिक मागणी आहे.

दिवसेंदिवस लिंबाची मागणी वाढत जाणार असून, त्या पटीत लिंबाची आवक घटणार आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबाचे भाव आणखी वाढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news