इंदापूर : चोरीच्या उद्देशाने इंदापुरात आलेल्यांचा डाव फसला

इंदापूर : चोरीच्या उद्देशाने इंदापुरात आलेल्यांचा डाव फसला
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी (दि. 12) रात्री या सराईतांच्या घरफोडीचा डाव फिस्कटला. परिणामी, हे अट्टल गुन्हेगार थेट इंदापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या संदर्भात पोलिस हवालदार प्रवीण बाबासाहेब भोईटे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात आरोपी सुमित दगडू गर्गेवाड (वय 23, रा. मळवटी रोड, सिध्देश्वरनगर, लातूर) आणि शंभू विक्रम बुधवाडे (वय 20, रा. बाभुळगाव, ता. बाभूळगाव, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांविरोधात लातूर, उस्मानाबाद या पोलिस ठाण्यांसह कर्नाटक राज्यातदेखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी रात्री पोलिस हवालदार प्रवीण भोईटे, प्रवीण शिंगाडे, समाधान केसकर हे रात्रगस्तीसाठी इंदापूर शहरात निघाले होते. महतीनगर भागात हे दोघे संशयित पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे एक काळ्या रंगाची मोटारसायकल होती. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळ काढला.

त्यावेळी भोईटे, शिंगाडे आणि केसकर यांच्यासह वैभव अशोक शेंडे, अतुल बलभीम आरणे, प्रताप बाबासाहेब भोईटे यांनी या संशयितांचा पाठलाग करून त्यापैकी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांचे ताब्यातील मोटारसायकल (एमएच 24 बीक्यु 9220) पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व कर्मचार्‍यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news