वाढलेल्या खर्चामुळे अनेक नाट्यनिर्मात्यांनी नाटकांच्या प्रयोगांची संख्या कमी केली असून, पुण्यात तर फक्त शनिवारी आणि रविवारी म्हणजेच विकेंडलाच नाट्यप्रयोग होत आहेत. कलाकारांचे मानधन, पडद्यामागील कलाकारांचे मानधन, प्रसिद्धीचा खर्च, नाट्यगृहाचे भाडे, वाहतुकीचा खर्च..असे विविध खर्च वाढल्यामुळे निर्मात्यांना नाटक करणे परवडणारे नाही. त्यामुळे नाटकाचा खर्च कमी होऊन रंगभूमीवर जुने दिवस यावेत, अशी आस कलाकारांना आहे.– दीपक रेगे, ज्येष्ठ रंगकर्मी.एका प्रयोगाचा खर्च करणे आम्हा निर्मात्यांना परवडणारा नाहीच. नाटकांचे दौरे करणेही महागले आहे. वाहतुकीच्या खर्चापासून ते कलाकारांच्या मानधनापर्यंतचा खर्च वाढला आहे. दौर्यामध्ये एका प्रयोगासाठी 2 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे, त्यामुळे नाटकांचे दौरे करतानाही आम्हाला विचार करावा लागतो. जोखीम पत्करून निर्माते प्रयोग करत आहेत.– राहुल भंडारे, नाट्यनिर्माता.