Pune Water Crisis
पाण्याचा वापर जपून करा! महापालिकेचे नागरिकांना आवाहन pudhari

Pune Water Crisis: पाण्याचा वापर जपून करा! महापालिकेचे नागरिकांना आवाहन

बचतीचे सांगितले विविध मार्ग
Published on

Importance of saving water during water shortage

पुणे: उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याची मागणी पूर्ण करताना पालिकेची दमछाक होत आहे. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय नागरिकांकडून केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेमार्फत केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शैक्षणिक संस्था, सहकारी गृहरचना संस्था, प्रत्येक हॉस्पिटल, हॉटेल्स यांना पाणीबचतीसाठी संस्थेतील नळांना एरिओटर नोझल लावण्यास सांगितले आहे. (Latest Pune News)

Pune Water Crisis
Pune News : दक्षिण पुण्यातील पाणीकपात अखेर रद्द!

यामुळे महिना तीन टँकर पाण्याची बचत केली जाऊ शकते, तर बोअरवेलचे पुनर्भरण शंभर टक्के करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे. यासाठी महानगरपालिका करात पाच टक्के सवलत देते. भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी रेनवॉटर ड्रेनच्या जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यामुळे विहिरीची, बोअरवेलची, तळ्याची व भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते.

संस्थेचा अथवा सोसायटीत एसटीपी प्लांट असेल तर त्यामधील प्रक्रिया केलेले पाणी बागेला, फ्लशिंगसाठी व साफसफाईसाठी वापरावे. गाडी धुण्यासाठी, रस्ते व अंगण धुण्यासाठी, झाडांना व सडा घालण्यासाठी नळाला रबरी पाइप लावून प्रेशरने पाण्याचा वापर केला जातो.

Pune Water Crisis
Monsoon Weather Update| आनंद वार्ता : मान्सून १३ में पर्यंत अंदमानात येणार; हवामान विभागाची घोषणा

यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने यासाठी बोअरच्या पाण्याचा वापर बादली/झारी इत्यादीने करावा. टाक्या गळत असल्याने व ओव्हरहेड टाक्या ओव्हरफ्लो होत असल्याने देखील पाणी वाया जात असल्याने त्यांची दुरुस्ती करून लेव्हल इंडिकेटर बसवावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news