Pune Rain
लवासा सिटी कडे जाणारा मुख्य रस्ता टेमघर (ता. मुळशी) घाटात खचलेले छायाचित्र. (छाया : तेजस जोगावडे)Pudhari Photo

Pune Rain | लवासा सिटीकडे जाणारा मुख्य रस्ता टेमघर घाटात खचला

रस्ता वाहतुकीसाठी बंद

खारावडे : लवासा सीटीकडे जाणार मुख्य रस्ता टेमघर ( ता. मुळशी) येथील घाटात खचला आहे. या परिसरामध्ये सलग चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडल्यामुळे या रस्त्या खचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या एका कडेच्या आतील भाग वाहून जाऊन, अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता खचला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

मुळशी सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने पर्याय रस्त्याचे काम चालू आहे. परंतु पुढील 12 ते 15 तासासाठी हा रस्ता बंद राहणार आहे. या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पर्यायी रस्ता करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी काम करीत आहेत.

अचानक झालेल्या पावसामुळे हा रस्ता खचल्यामुळे लवासाकडे जाणारी वाहतूक व लवासाकडून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक रहिवासी व काही फिरायला आलेले पर्यटक लवासामध्ये अडकून पडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी हा रस्ता बंद असणार आहे. त्यामुळे लवासा सिटीकडे पर्यटकांनी येऊ नये असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news