Yezdi रोडकिंग बाईक पुन्हा एकदा बाजारात

Yezdi roadking bike
Yezdi roadking bike

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तुम्हाला 80 च्या दशकातली Yezdi ही बाईक नक्कीच आठवत असेल. ही बाईक नव्या रूपात पुन्हा लाँच होण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार Yezdi रोडकिंग ही मोटारसायकल पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच कंपनीने 3 नवीन मोटारसायकली बाजारात आणल्या होत्या, परंतु त्यात 'रोडकिंग' हे नाव गायब होते. पण एका अहवालानुसार क्लासिक लीजेंड्स हे एका नवीन मोटरसायकलच्या रूपात रोडकिंग नावाला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखत आहे. ती या ब्रँडची नवीन फ्लॅगशिप ऑफर असेल. अशी माहिती क्लासिक लीजेंड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना दिली.

ही बाईक रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 ला बाजारात दमदार टक्कर देऊ शकते. अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत ग्राहकांचा कल हा अॅडव्हेन्चर स्टाईल्स असलेल्या बाईककडे असल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता त्यासोबतच रेस्ट्रो स्टाईललाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. या सेगमेंटमध्ये हीरो मोटोकॉर्पपासून रॉयल एन्फिल्ड पर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या बाईकची मॉडेल्स सादर केली आहेत. दरम्यान, Yezdi बाईक्सची आवड असलेल्या तरूणांना आकर्षित करण्यासाठी कंपनीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या बाईकच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु असं मानलं जातं की यामध्ये कंपनीने 652cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे. जो जावाच्या बाईक्समध्येही दिसून येतो.
हा BSA मोटरसायकल ब्रँड सुरुवातीला युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी असला तरी, भारतीय बाजारात रोडकिंगला Yezdi मॉडेलच्या रुपात सादर केले जाईल. फुल-एलईडी लाइटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, रायडर अॅनालिटिक्ससह येझदी अॅप आणि ड्युअल-चॅनल ABS यांसारखी वैशिष्ट्ये या बाईक मध्ये पाहायला मिळतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news