Pune Crime News|पत्नीचा खून करून फाशीचा बनाव; स्वप्निलचे बिंग पोलिसांकडून उघड

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीचे सहकानगर पोलिसांनी बिंग उघड करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Husband arrested in case of wife's murder
त्नीचा खून करून फाशीचा बनावPudhari File Photo
Published on
Updated on

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारल्याची घटना ६ जुलैला धनकवडीतील चव्हाणनगरमध्ये घडली. पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीचे सहकानगर पोलिसांनी बिंग उघड करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Husband arrested in case of wife's murder
IND vs ZIM : भारताचा मालिका विजय

अंजली स्वप्निल मोरे (वय २९, रा. पांचाळ वस्ती, चव्हाणनगर, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती स्वप्निल मोरे (वय ३०, रा. घोरपडी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंके यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली आणि स्वप्निल यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच स्वप्निल हा अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिच्यासोबत सातत्याने भांडण करून मानसिक त्रास देऊ लागला. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून ६ जुलैला दोघात वादावादी झाली. त्याच रागातून त्याने पत्नी अंजलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खून पचविण्यासाठी त्याने पत्नीच्या आत्महत्येचा बनाव रचला.

Husband arrested in case of wife's murder
स्‍वप्‍नपूर्ती..! विम्बल्डनची नवी 'क्वीन' बार्बोरा क्रेजिकोवा

पत्नी अंजलीने आत्महत्या केल्याचे दर्शविण्यासाठी त्याने तिला दोरीने घराच्या छताला लटकवले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पत्नीने गळफास घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्या वेळी काही गोष्टी संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली.

सहकारनगर पोलिस पथकातील अंमलदारांना पत्नीचा खून करून पती पळून गेला असल्याची माहिती मिळाली. पतीला ताब्यात घेतले. त्या वेळी स्वप्निलने पत्नी अंजलीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, रेश्मा साळुंखे, किरण कांबळे, महेश मंडलिक, अमोल पवार, सागर सुतकर यांच्या पथकाने आरोपी पतीला बेड्या ठोकल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news